आमची यशोगाथा
सावरगाव हे अगस्ती नदीच्या किनारी नगर-मनमाड रोड वर येवला या शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर वसलेले एक इंग्रज शासन कालीन गाव म्हणून या गावाला कचेरीचे सावरगाव असे म्हटले जात होते. आता स्वामी समर्थांचे सावरगाव म्हणून ओळखले जाते.या गावाला भरगोस असा संस्कृतीक, राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यामध्ये श्री स्वामी समर्थ मठ खूप प्राचीन आहे. तसेच इंग्रज शासन कालीन पडलेल्या वास्तुंचे अवशेष येथे सापडतात. राजकीय दृष्ट्या विचार केल्यास सावरगावचे भूमिपुत्र मा. श्री मारोतराव नारायणराव पवार हे येवला विधानसभा मतदार संघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आलेले आहे.या गावामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती आहे. गावाची लोकसंख्या ही 3777 (2011 नुसार )आहे.या गावात भरणारा कावड मिरवणूक उत्सव खूप प्रसिद्ध आहे. गाव शाळा, अंगणवाडी, महाविद्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना, मेडिकल, बँक, इ सेवा केंद्र, दूध संकलन केंद्र, सुसज्ज व्यायाम शाळा, वाचनालय, भक्त निवास,हॉटेल, बस, या सुविधानी सुसज्ज आहे.गावाच्या उत्तर बाजूस मोठा बंधारा आहे त्यामुळे गावाच्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होतो.गावातील सर्व रस्ते पक्के आहेत. व ते मुख्य रस्त्याला जोडलेले आहेत. गावामध्ये स्वच्छता खूप कमालीची आहे. झाडा-झुडुपाणी अच्छादलेले हे गाव खूप प्रगतीशील आहे.