"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

सावरगाव हे अगस्ती नदीच्या किनारी नगर-मनमाड रोड वर येवला या शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर वसलेले एक इंग्रज शासन कालीन गाव म्हणून या गावाला कचेरीचे सावरगाव असे म्हटले जात होते. आता स्वामी समर्थांचे सावरगाव म्हणून ओळखले जाते.या गावाला भरगोस असा संस्कृतीक, राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यामध्ये श्री स्वामी समर्थ मठ खूप प्राचीन आहे. तसेच इंग्रज शासन कालीन  पडलेल्या वास्तुंचे अवशेष येथे सापडतात. राजकीय दृष्ट्या विचार केल्यास सावरगावचे भूमिपुत्र मा. श्री मारोतराव नारायणराव पवार हे येवला विधानसभा मतदार संघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आलेले आहे.या गावामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती आहे. गावाची लोकसंख्या ही 3777 (2011 नुसार )आहे.या गावात भरणारा कावड मिरवणूक उत्सव खूप प्रसिद्ध आहे. गाव शाळा, अंगणवाडी, महाविद्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना, मेडिकल, बँक, इ सेवा केंद्र, दूध संकलन केंद्र, सुसज्ज व्यायाम शाळा, वाचनालय, भक्त निवास,हॉटेल, बस, या सुविधानी सुसज्ज आहे.गावाच्या उत्तर बाजूस मोठा बंधारा आहे त्यामुळे गावाच्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होतो.गावातील सर्व रस्ते पक्के आहेत. व ते मुख्य रस्त्याला जोडलेले आहेत. गावामध्ये स्वच्छता खूप कमालीची आहे. झाडा-झुडुपाणी  अच्छादलेले हे गाव खूप प्रगतीशील आहे.

       

प्रगतीच्या वाटेवर- ग्रामपंचायत सावरगाव, येवला

औद्योगिकीकरण येतंय, पण परंपरा जपली जातेय. इथं मातीचा गंध आहे, पण त्यात यंत्रांचं सूर मिसळू लागलाय. इथं देवळात दोन मूर्ती आहेत, पण गावाच्या हृदयात एकच माणुसकी आहे. खतवडचं नाव मोठ्या नकाशावर असो वा नसो, पण एक-ना एक दिवस नक्कीच गाव नावा रूपास आणण्याची ग्रामपंचायतचे उत्साही सरपंच,उपसरपंच,ग्रा.प अधिकारी    व सदस्य मंडळ व ग्रामस्थ खुणगाठ मनाशी बाळगून असल्याचे दिसून येत आहे . संकलन-सुकदेव खुर्दळ-उपसरपंच ग्रामपंचायत खतवड, बाणगंगा नदी गावाच्या पायथ्याशी वाहते,तर मोती नाला गावाला वळसाघालून सौदर्यात भर घालतो, कधी शांत, कधी खळखळाट करणारे नदी-नाले पावसाळ्यात ही गावाच्या साक्षीने नाचते,  इथली माती म्हणजे गावकऱ्यांचं गर्भसंपन्न बँक खाते. त्यात मोलमजुरीचा घाम, शेतीचा कष्ट आणि भविष्याचं रोपटं रुजवलेलं आहे. आणि हे सगळं सांभाळणारे माणसं प्रेमळ, सहकार्यशील आणि जिद्दी.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा,,,

लोकसंख्या आकडेवारी


377
3,130
1,638
1,492

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo